जिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती प.पू. श्री जानकी आई अर्थात बायजी. आज जानकी आई जरी देहाने आपल्यात नसली तरी ती चराचरात वास्तव्य करुन आहे. तिचा कृपा कटाक्ष भक्तांवर सदैव आहे आणि त्याची प्रचिती वेळोवेळी येतच असते.
जानकी आईचे पद्यरुपी जीवनचरित्र म्हणजेच “सावली” ही पोथी आपल्याला सदैव प्रेमाची सावली देतच असते. प.पू. जानकी आईची ही संपूर्ण चरित्रात्मक पोथी लिहिली आहे प.पू. मधुकर अर्थात भाऊकाका सुळे यांनी. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या या “सावली”ने भक्तांना सदैव जानकी आईची माया दिली. “सावली”च्या वाचनाने भक्तांना श्री जानकी आईला प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव दिला.
“सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या. “सावली”चे इंग्रजी भाषांतरही आता उपलब्ध आहे. आणि आता संपूर्ण “सावली” आपण वाचू शकता या वेबसाईटवर. एवढंच नाही, तर संपूर्ण “सावली” पोथी MP 3 स्वरुपात आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन ऐकण्याचीही सोय उपलब्ध झाली आहे. हे वाचन केले आहे श्री जानकी आईची नात; कै सौ कालामावशींची मुलगी सौ सुरेखा कुलकर्णी म्हणजेच सुरेखाताई हिने. निवेदन केले आहे श्री जानकी आईची खापरपणती; कै सौ. चिमणाबाई प्रधान यांची पणती सौ धनश्री प्रधान-दामले हिने.
चला तर मग ! वाचूया अणि ऐकूयासुद्धा !
संपूर्ण सावली