बायजी मानवरुप धारिणी । सुभक्तां, जगदंबा-जननी ।।धृ.।।
मानवतेचें दु:ख हराया । हरि हराची जन्मे माया ।
विनम्र व्हावे पदकमलां या । बायजी, भक्ता वरदायिनी ।।१।।
भवार्णवातील दु:ख हराया । बायजीचे जे पडती पायां ।
कल्पतरूची मिळेल छाया । बायजी, भक्ता सुखदायिनी ।।२।।
तुझे मनोरथ उरलें काम । कुसुम करितसे ते निष्काम ।
सुगंध पसरी – दे विश्राम । तुझी “बा” प्रतिमा अवतरुनी ।।३।।
बायजीचे जे घेती नाम । पूर्ण मनोरथ हेतू काम ।
सुख-शांतिचे सकलां धाम । ठाव “बा” देई तव चरणीं ।।४।।
Leave a Reply