जय जानकी दुर्गेश्वरी

गुजरातमधल्या गणदेवी गावात राहून भक्तांच्या हाकेला सदैव धावून जाणारी श्री जानकी आई.... कुणी तिला जानकी आई म्हणतात तर कुणी बायजी... तिचं कुठे मंदीर नाही... आणि असायचं कारणही नाही कारण तिचं स्थान आहे आपल्या सर्वांच्या हृदयात. तिच्या कृपाप्रसादाने आजवर हजारो भक्तांना मायेची सावली मिळाली आहे आणि यापुढेही मिळतच राहिल. आजीची जीवनकहाणी सांगणार्‍या पोथीचंही नाव “सावली”च.


श्री क्षेत्र गणदेवी

दक्षिण गुजरातमधल्या बिलिमोरा शहराच्या जवळच गणदेवी गाव आहे. हे तसं फार छोटं गाव, मात्र आता बर्‍यापैकी मोठं झालंय. गणदेवी हे तालुक्याचं ठिकाण. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत.

मुंबईहून रस्त्याने गणदेवीचा प्रवास जेमतेम ४ तासांचा. अहमदाबाद हायवेपासून आत सुमारे ८-१० किलोमिटरवर हे गाव आहे. जवळचे रेल्वे स्थानक बिलिमोरा, मात्र इथे फार कमी गाड्या थांबतात. नवसारी येथूनही गणदेवीला जाता येते. बिलिमोरा-नवसारी राज्य महामार्गावर हे गाव आहे.
Read More..

श्री क्षेत्र गणदेवीला जाण्याचा रस्ता

।। बायजींची आरती ।।

बायजी मानवरुप धारिणी । सुभक्तां, जगदंबा-जननी ।।धृ.।।
 
मानवतेचें दु:ख हराया । हरि हराची जन्मे माया ।
विनम्र व्हावे पदकमलां या । बायजी, भक्ता वरदायिनी ।।१।।
 
भवार्णवातील दु:ख हराया । बायजीचे जे पडती पायां ।
कल्पतरूची मिळेल छाया । बायजी, भक्ता सुखदायिनी ।।२।।
 
तुझे मनोरथ उरलें काम । कुसुम करितसे ते निष्काम ।
सुगंध पसरी - दे विश्राम । तुझी “बा” प्रतिमा अवतरुनी ।।३।।
 
बायजीचे जे घेती नाम । पूर्ण मनोरथ हेतू काम ।
सुख-शांतिचे सकलां धाम । ठाव “बा” देई तव चरणीं ।।४।।

जानकी आईचे कार्य यांनी पुढे चालविले

     

 

जानकी आईंचे कार्य पुढे चालवले ते या पूज्य व्यक्तींनी...

बायजी बावनी – व्हिडिओ

MP3 डाऊनलोडस

संपूर्ण सावली पोथीचे सर्व अध्याय त्याचबरोबर विविध स्तोत्रेसुद्धा आपण या साईटवर वाचू आणि ऐकू शकताच. आपल्याला ते थेट आपल्या संगणकावर किंवा मोबाईलवर हवे असतील तर येथून डाऊनलोडही करु शकता.

डाऊनलोडच्या पानावर चला....

सावली पोथी – हिंदी अनुवाद

सावली पोथी आता वाचा हिंदीमध्येही
 
हा अनुवाद केलाय अमेरिकास्थित सौ माधवी मोहीले खापेकर यांनी..

गणदेवी गावाचा नकाशा