<bgsound="/media/Jap.mp3" loop="11">
जय जानकी दुर्गेश्वरी .......... जय जानकी दुर्गेश्वरी .......... जय जानकी दुर्गेश्वरी .......... जय जानकी दुर्गेश्वरी ..........
 • जय जानकी दुर्गेश्वरी
  गुजरातमधल्या गणदेवी गावात राहून भक्तांच्या हाकेला सदैव धावून जाणारी श्री जानकी आई.... कुणी तिला जानकी आई म्हणतात तर कुणी बायजी... तिचं कुठे मंदीर नाही... आणि असायचं कारणही नाही कारण तिचं स्थान आहे आपल्या सर्वांच्या हृदयात. तिच्या कृपाप्रसादाने आजवर हजारो भक्तांना मायेची सावली मिळाली आहे आणि यापुढेही मिळतच राहिल. आजीची जीवनकहाणी सांगणार्‍या पोथीचंही नाव “सावली”च.
 • Box-C-1
श्री क्षेत्र गणदेवी
 • दक्षिण गुजरातमधल्या बिलिमोरा शहराच्या जवळच गणदेवी गाव आहे. हे तसं फार छोटं गाव, मात्र आता बर्‍यापैकी मोठं झालंय. गणदेवी हे तालुक्याचं ठिकाण. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत. मुंबईहून रस्त्याने गणदेवीचा प्रवास जेमतेम ४ तासांचा. अहमदाबाद हायवेपासून आत सुमारे ८-१० किलोमिटरवर हे गाव आहे. जवळचे रेल्वे स्थानक बिलिमोरा, मात्र इथे फार कमी गाड्या थांबतात. नवसारी येथूनही गणदेवीला जाता येते. बिलिमोरा-नवसारी राज्य महामार्गावर हे गाव आहे.
 • Box-C-2
आपली जानकी आई
 • जिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती श्री जानकी आई अर्थात बायजी.

   आज जानकी आई जरी देहाने आपल्यात नसली तरी ती चराचरात वास्तव्य करुन आहे. तिचा कृपा कटाक्ष भक्तांवर सदैव आहे आणि त्याची प्रचिती वेळोवेळी येतच असते.

   जानकी आईचे पद्यरुपी जीवनचरित्र म्हणजेच “सावली” ही पोथी आपल्याला सदैव प्रेमाची सावली देतच असते. “सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या. “सावली”चे इंग्रजी भाषांतरही आता उपलब्ध आहे.

  मधुकरकाका सुळे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या “सावली”ने भक्तांना सदैव जानकी आईची माया दिली.
 • Box-C-2-L
गणदेवी गावाचा नकाशा
जानकी आईचे कार्य यांनी पुढे चालविले
 •      
 • Box-C-3